” जनसेवा हीच ईश्वरसेवा “
सेवा
आपल्या हिंदू संस्कृतीत नराचा नारायण होणे अशी एक संकल्पना आहे.
त्याप्रमाणे मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या दुर्लक्षित उपेक्षित समाज बांधवांविषयी समाजातील सर्वांच्या मनात आत्मीयता व प्रेमभाव निर्माण करून सेवाकार्याद्वारे अशा वंचित घटकांना बळ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे यावर संस्थेच्या कार्याचा भर आहे.
वाङ्मय
समाज परिवर्तनासाठी वाङ्मय साहित्य हे फार मोलाचे कार्य करीत असतात.
प्राचीन धर्मग्रंथ, राष्ट्रीय विचारधारांची पुस्तके, मान्यवर साहित्यिकांचे साहित्य, संतवाङ्मय यांनी समाजाला एक दिशा मिळते व सर्व समाज समान विचारधारेवर एकसंघ राहण्यास मदत होते.
“जो शिकेल तो टिकेल” या भावनेतून वाङ्मय साहित्याच्या माध्यमातून संस्थेचे कार्य अविरत चालू आहे.
समाज प्रबोधन
“शहाणे करून सोडावे सकल जन” या संतवाणीप्रमाणे व्यक्ति संस्कारित करत समाज संघटन करण्यासाठी समाज प्रबोधन हा विषय संस्थेने आपल्या उद्दिष्टांमध्ये घेतले आहे.
केवळ एक व्यक्ति संस्कारीत , गुणवान अथवा समाजसेवा करणारी असून चालत नाही तर अनेक जण एकत्र येऊन प्रभावी शक्ती निर्माण करतील असा विश्वास समाज मनावर बिंबवण्यासाठी संस्थेद्वारे विविध कार्यक्रमांची रचना केली जाते.
महिला विभाग
राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा अनेक ज्ञात अज्ञात मातांचे समाज निर्मितीच्याकार्यात व सामाजिक सुधारणांच्या बाबतीत खूपच महत्वाचे योगदान आहे. अशा सर्व थोर माता वंदनीय पूजनीय आहेत. त्यांच्या आशिर्वादाने व कार्याच्या प्रेरणेने संस्थेचा महिला विभाग कार्यरत आहे.
संस्थेच्या ध्येय उद्धिशनूसार “सेवा, वाडमय, समाज प्रबोधन” या त्रिसूत्रीच्या आधारे संस्थेच्या महिला विभागाचे काम पुणे जिल्ह्यात सुरू आहे. प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, संस्कार, संस्कृती, महिला सबलीकरण, उद्योजकता, जनजाती विकास या विषयांवर महिला विभाग सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहे.
संस्कार वर्ग
स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था संचलित “दिपज्योती संस्कार वर्ग” दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी इंदू निवास, सुदर्शन नगर येथील संस्थेच्या कार्यालयात सुरू करण्यात आला. या वर्गाच्या माध्यमातून दरवर्षी ५० विद्यार्थी सुसंस्कारित होत आहेत.
“सुसंस्कारित होऊया… देशाचे भविष्य घडवूया” हे ध्येय घेऊन एका विद्यार्थीनीपासून सुरू झालेल्या या संस्कार वर्गात बालकांमधे भारतीय संस्कृती आणि देशभक्ती रूजवण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात.
गुरूपौर्णिमा, आषाढी एकादशी, दहीहंडी, मातृदिन, नवरात्रोत्सव, दिपावली, मकर संक्रमण, होलिका उत्सव, हिंदू नववर्ष दिन या पारंपारिक उत्सवांचे वैज्ञानिक महत्व मुलांना सांगून हे उत्सव साजरे केले जातात.
संस्थेची माहिती
स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था
नोंदणी क्रमांक: पुणे, एफ१७८४४. (महाराष्ट्र/२१९-२०००)
सेक्टर २७, प्लॉट ५१३, प्राधिकरण, निगडी, पुणे – ४११०४४
“सेवा, वाङ्मय, समाजप्रबोधन” या त्रिसूत्री वर आधारित संस्थेच्या उद्दीष्टांची व कार्यांची आपण माहिती घेऊयात.
संस्थेची उद्दिष्टे
- समाजसेवेसाठी गोरगरीबांना रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे.
- गरजूंसाठी रूग्ण साहित्य नाममात्र भाडयाने देणे.
- हृदय शस्त्रक्रियेसाठी गरजू गरीब रूग्णांना अर्थ साहाय्य देणे.
- राष्ट्रीय विचारांचा प्रसार, प्रचार करणे व त्यासाठी विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रकाशन विक्री करणे.
- वारकरी संप्रदायासाठी रूग्णवाहिका देणे.
- आरोग्य शिबीरे भरवून आवश्यक रूग्णांना औषधोपचार करणे.
- पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात फिरता दवाखाना चालवणे व वैदयकिय सोयी उपलब्ध करणे.
- समाजातील गोरगरीब व हुशार विद्यार्थी, विद्यार्थींनीना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च भागविणे.
- पुणे जिल्हयात साक्षरतेचा प्रचार व प्रसार करण्याकरत;1 शैक्षणिक सोई उपलब्ध करण्यासाठी बालवाडी, प्रा. शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ (कला वाणिज्य, विज्ञान तांत्रिक तसेच अभियांत्रिकी, व्यवस्थापन) महाविद्यालये चालवणे.
- रक्तदान शिबीरे घेऊन, आयोजन करून गरजूंना व रक्तपेढ॒यांना पुरविणे.
- अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ञ रूग्णालय चालविणे.
- ग्रामीण भागात योगासने आयुर्वेद उपचारासंबंधी शिबीरे आयोजित करून योगविद्येचा प्रचार प्रसार करणे; तसेच आयुर्वेद औषधांसंबंधी समाजात जागृती व प्रसार करणे.
- सर्व समाजातील गोर गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे.
- कला व क्रिडा संस्कृती इत्यादी विषया संबंधी चर्चासत्र शिबिरे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.
- शहरी तसेच ग्रामीण भागात महिलांसाठी, नोकरदार व विद्यार्थी यांचे साठी वसतीगृह बांधणे.
- शहरी तसेच ग्रामिण भागात सार्वजनिक वाचनालये चालवणे.
- ग्रामिण भागात रात्रअभ्यासिका चालवणे.
- ग्रामीण भागातील समाजासाठी विविध आरोग्य शिबिरे, व्यायाम मार्गदर्शन केंद्र, महिलांसाठी शिवण वर्ग, कुटीर उद्योग, संगणक इ. संबंधी मार्गदर्शन केंद्र चालवणे.
- युवकांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण करून विविध क्रीडा संबंधी प्रशिक्षण वर्ग व मैदाने उपलब्ध करुन देणे इ.
- संस्थेच्या वतीने जेष्ठ अथवा निराधारांसाठी वृध्दाश्रम बांधणे व चालवणे, त्यासाठी आवश्यक त्यासोयीसुविधा उपलब्ध करून देणे.
दत्तोपंत म्हसकरांचा अल्पसा परिचय
स्व. दत्तोपंत म्हसकरांच्या कार्यातून त्यांच्या सामाजिक योगदानातून प्रेरणा घेऊन संस्थेची वाटचाल वृध्दींगत होत आहे, त्या दत्तोपंत म्हसकरांचा हा अल्पसा परिचय.
शांत मन, स्थिर बुध्दी, विशुध्द भावना, निष्कलंक चारित्र्य या आधारस्तभांवर उभे असलेले स्व. दत्तोपंतांचे जीवन मंदिर अनेक जणांचे प्रेरणा स्थान ठरले.
लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला आणि ते सहजपणे संघकार्याशी एकरूप झाले.
अंत:करणात रूजलेली संघनिष्ठा; परिस्थितीची बेचैन करणारी हाक यामुळे स्वाभाविकपणे स्व. दत्तोपंत संघप्रचारक म्हणून बाहेर पडले.
महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात संघप्रचारक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर १९७२ ते १९९४ या मोठया कालखंडात ते पुणे जिल्हाप्रचारक व पुणे विभाग प्रचारक म्हणून कार्यरत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशिष्ट कार्यशैलीतून समाजासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जी शृंखला आहे, त्या शुंखलेतील एक कडी म्हणजेच स्व. दत्तोपंत म्हसकर.
एक धीरोदत्त, सर्वांमध्ये सहजपणे समरस होणारे, जाईल तेथे उत्साह फुलवणारे उमदे व्यक्तिमत्व ७ जुलै १९९४ मध्यान्ही अनंताच्या प्रवासास निघून गेले. स्व. दत्तोपंतानी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संघविचाराने अनेक सामाजिक प्रकल्पांना गती दिली.
त्यांच्या प्रेरणेतून अनेक व्यक्ती, प्रकल्प, संस्था विविध सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत.
स्व. दत्तोपंताच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
सहायता निधी
आपणास संस्थेची कार्यपद्धती आणि कार्यक्रम आवडत असल्यास, कृपया आपल्या आवडीच्या रकमेसह आर्थिक सहाय्य करावे. दिलेली देणगी 80G सवलतीसाठी पात्र आहे.
संपर्क
संपूर्ण पत्ता:
सेक्टर २७, प्लॉट ५१३,
संत तुकाराम गार्डन समोर,
प्राधिकरण, निगडी, पुणे – ४११०४४
फोन नंबर:
+९१ ८८८८८ ५९५९९
+९१ ९५५२५ ४६५०१
+९१ ९९२२० ५२६८६
ई-मेल:
contact@dattopantmhaskarsanstha.orgसंस्थेचे कार्यकारी मंडळ
- श्री प्रदीप रामचंद्र पवार (अध्यक्ष)
- श्री मिलिंद मधुकर कुलकर्णी (सचिव)
- श्री विवेक कल्याण पत्तरकीने (उपाध्यक्ष) – MSW LLB
- सौ भाग्यश्री नारायण अत्रे/जोशी (सहसचिव) – M Pharm PhD
- श्री अविनाश अशोक ब्रह्मे (कोषाध्यक्ष)
- श्री संदीप गोपाळ पंडित (सह कोषाध्यक्ष) – M Com LLB
- श्री नरेश जोह्रिमल गुप्ता (कार्य.सदस्य)
- श्री अभिजीत अनिल सोनटक्के – CA
- डॉ. श्रीराम श्रीकृष्ण नेरलेकर – PhD
- श्री तुकाराम संभाजी पांचाळ
- श्री नरेंद्र केशव खांबे
- श्री माहेश्वर मराठे (रा. स्व. संघ पि. चि. जिल्हा कार्यवाह) – CA
- श्री मुकुंद वासुदेव कुलकर्णी (रा. स्व. संघ पुणे विभाग कार्यवाह)