” जनसेवा हीच ईश्वरसेवा

संस्थेचे कार्यक्रम, उपक्रम आणि उद्दिष्टे ऐका.


संस्थेची उद्दिष्टे

  1. समाजसेवेसाठी गोरगरीबांना रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे.
  2. गरजूंसाठी रूग्ण साहित्य नाममात्र भाडयाने देणे.
  3. हृदय शस्त्रक्रियेसाठी गरजू गरीब रूग्णांना अर्थ साहाय्य देणे.
  4. राष्ट्रीय विचारांचा प्रसार, प्रचार करणे व त्यासाठी विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रकाशन विक्री करणे.
  5. वारकरी संप्रदायासाठी रूग्णवाहिका देणे.
  6. आरोग्य शिबीरे भरवून आवश्यक रूग्णांना औषधोपचार करणे.
  7. पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात फिरता दवाखाना चालवणे व वैदयकिय सोयी उपलब्ध करणे.
  8. समाजातील गोरगरीब व हुशार विद्यार्थी, विद्यार्थींनीना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च भागविणे.
  9. पुणे जिल्हयात साक्षरतेचा प्रचार व प्रसार करण्याकरत;1 शैक्षणिक सोई उपलब्ध करण्यासाठी बालवाडी, प्रा. शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ (कला वाणिज्य, विज्ञान तांत्रिक तसेच अभियांत्रिकी, व्यवस्थापन) महाविद्यालये चालवणे.
  10. रक्तदान शिबीरे घेऊन, आयोजन करून गरजूंना व रक्तपेढ॒यांना पुरविणे.
  11. अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ञ रूग्णालय चालविणे.
  12. ग्रामीण भागात योगासने आयुर्वेद उपचारासंबंधी शिबीरे आयोजित करून योगविद्येचा प्रचार प्रसार करणे; तसेच आयुर्वेद औषधांसंबंधी समाजात जागृती व प्रसार करणे.
  13. सर्व समाजातील गोर गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे.
  14. कला व क्रिडा संस्कृती इत्यादी विषया संबंधी चर्चासत्र शिबिरे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.
  15. शहरी तसेच ग्रामीण भागात महिलांसाठी, नोकरदार व विद्यार्थी यांचे साठी वसतीगृह बांधणे.
  16. शहरी तसेच ग्रामिण भागात सार्वजनिक वाचनालये चालवणे.
  17. ग्रामिण भागात रात्रअभ्यासिका चालवणे.
  18. ग्रामीण भागातील समाजासाठी विविध आरोग्य शिबिरे, व्यायाम मार्गदर्शन केंद्र, महिलांसाठी शिवण वर्ग, कुटीर उद्योग, संगणक इ. संबंधी मार्गदर्शन केंद्र चालवणे.
  19. युवकांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण करून विविध क्रीडा संबंधी प्रशिक्षण वर्ग व मैदाने उपलब्ध करुन देणे इ.
  20. संस्थेच्या वतीने जेष्ठ अथवा निराधारांसाठी वृध्दाश्रम बांधणे व चालवणे, त्यासाठी आवश्यक त्यासोयीसुविधा उपलब्ध करून देणे.

संपर्क

📍 Our Location

संपूर्ण पत्ता:

सेक्टर २७, प्लॉट ५१३,

संत तुकाराम गार्डन समोर,

प्राधिकरण, निगडी, पुणे – ४११०४४