गरजू रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपकरणे

स्व. दत्तोपंत म्हस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने गरजू रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे ठराविक कालावधीसाठी मोफत वापरासाठी उपलब्ध करून दिली जातात.
उपकरणांची काळजी घेऊन योग्य स्थितीत परत मिळावी यासाठी Security Deposit (अमानत रक्कम) घेतली जाते. उपकरण परत करताना स्थिती योग्य असल्यास ही अमानत परत केली जाते.

उपलब्ध उपकरणे (अमानत रक्कमेसह)

  • फॉलर बेड (Fowler Bed) — ₹15,000
  • वॉकर (Walker) — ₹800
  • हेवी-ड्युटी क्रचेस (Crutches Heavy Duty) — ₹1,200
  • कमोड चेअर (Commode Chair) — ₹1,000
  • युरिन पॉट (Urine Pot) — ₹50
  • बेड पॅन (Bed Pan) — ₹80
  • व्हील चेअर (Wheel Chair) — ₹6,200

टीप: उपलब्धता (stock) परिस्थितीनुसार बदलू शकते.

नियम व अटी

  • उपकरण ज्या स्थितीत मिळाले त्या स्थितीत परत करणे आवश्यक
  • नुकसान/तोडफोड/वस्तू हरवणे झाल्यास त्याचा खर्च भाडे घेणाऱ्यावर राहील
  • उपकरणाचा योग्य वापर व देखभाल ही भाडे घेणाऱ्याची जबाबदारी

📞 फोन नंबर

+९१ ८८८८८ ५९५९९ / +91 88888 59599
+९१ ९५५२५ ४६५०१ / +91 95525 46501
+९१ ९९२२० ५२६८६ / +91 99220 52686