सेवा

आपल्या हिंदू संस्कृतीत नराचा नारायण होणे अशी एक संकल्पना आहे. त्याप्रमाणे मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या दुर्लक्षित उपेक्षित समाज बांधवांविषयी समाजातील सर्वांच्या मनात आत्मीयता व प्रेमभाव निर्माण करून सेवाकार्याद्वारे अशा वंचित घटकांना बळ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे यावर संस्थेच्या कार्याचा भर आहे.

तथापी हे करीत असताना दयाबुध्दी कृपा करणे वा सहानुभूती या भावना संस्थेला अपेक्षित नसून कर्तव्याची भावना अपेक्षित आहे.

संस्थेच्या सेवाकार्याची रचना प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, जनजाती विकास या विषयांवर लक्ष केंद्रित करुन त्या प्रमाणे कार्यक्रमांची जोड दिली जाते.

शिक्षण

  1. पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी शालेय साहित्य वाटप करणे.
  2. सर्व समाजातील गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे.
  3. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी उत्तेजनार्थ विशेष आर्थिक पुरस्कार (सन्मान) देणे.
  4. ग्रामीण व दुर्गम भागात अभ्यासिका व मार्गदर्शन वर्ग भरववणे.
  5. साक्षरतेचा प्रसार व प्रचार यासाठी बालवडी संस्कार वर्ग प्राथमिक शाळा यांना सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करणे.

मार्गदर्शन


  1. कला, क्रीडा, संस्कृती इत्यादी संबंधी चर्चासत्रे व शिबीरे आयोजित करणे.
  2. शाळा महाविद्यालयात बालक, पालक व शिक्षक वर्ग यांसाठी समुपदेशन व ध्यानधारणा वर्गाचे आयोजन करणे.

आरोग्य

  1. पुणे जिल्हयातील सुमारे ५०० विद्यार्थ्याची दरवर्षी आरोग्य तपासणी शिबीरे घेऊन उपचाराची व्यवस्था संस्थेमार्फत केली जाते.
  2. दुर्गम व ग्रामीण भागात सर्व समाजासाठी मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात उपचार केले जातात.
  3. गरजूंसाठी रूग्ण साहित्य वाटप केंद्र चालविले जाते.
  4. अत्यंत गरीब व गरजू रूग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
  5. दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ते रक्त रक्तपेढीत व आवश्यक असणाऱ्या रूग्णास पुरविले जाते.
  6. योगासने व आयुर्वेद या संबंधित शिबीरे आयोजित करून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेतर्फे केले जाते.

ग्रामविकास

  1. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संस्थेच्या उपक्रमातून मोठा हातभार लागत आहे. श्री क्षेत्र देहूगाव ते पंढरपूर या पालखी सोहळयात निर्मल वारी अभियानाद्वारे हजारो भाविकांना सामाजिक जाणिवेतून प्रबोधन व ग्रामस्वच्छता याविषयी संस्था कार्यरत आहे.
  2. जिल्हयातील शेतीचे माती परीक्षण करून शेतीचा कस व घेण्यात येणाऱ्या पिकांची अभ्यासपूर्ण माहिती शेतकरी बंधूना तज्ञां मार्फत सांगितली जाते.

जनजाती विकास

वनवासी भागातील बांधवांसाठी मेळावे, चर्चासत्र व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांचे अधिकार व समाजाप्रती भाव यासाठी संस्था सात्यताने प्रयत्न करते.

शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, जनजाती विकास ही ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून समाजातील सर्वांच्या मनामध्ये आत्मीयता व प्रमभाव निर्माण करून सर्व समाजाला राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करून घेणे हे संस्थेच्या सेवा कार्याचे ध्येय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *