समाज परिवर्तनासाठी वाडमय साहित्य हे फार मोलाचे कार्य करीत असतात. प्राचीन धर्मग्रंथ, राष्ट्रीय विचारधारांची पुस्तके, मान्यवर साहित्यिकांचे साहित्य, संतवाडमय यांनी समाजाला एक दिशा मिळते व सर्व समाज समान विचारधारेवर एकसंघ राहण्यास मदत होते. म्हणूनच संस्थेच्या कार्यात साहित्य याला विशेष महत्व आहे. असे सर्व साहित्य समाजात तळागाळापर्यंत पोहचविण्यांचे महत्वपूर्ण कार्य संस्था करीत आहे.
- आजपर्यंत संस्थेने बखर अयोध्येची’ हा रामजन्मभूमीचा अभ्यासपूर्ण ग्रंथ, तसेच ‘स्मृती पारिजात’ हा पूजनीय गोळवलकर गुरूजी यांच्या वरील गीतांचा संग्रह तसेच ‘गो-विज्ञान, गोमातेचे महत्व’, ‘स्वामी विवेकानंद व संघप्रार्थना’, ‘श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.
- पुणे जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे प्रेरणादायी, चिंतनशील साहित्य पोहोचावे यासाठी वाडमय साहित्य विक्री केंद्र संस्था चालविते.
- छोट्या छोट्या गावात वस्तीत तसेच विविध कार्यक्रमात पुस्तकांचे प्रदर्शन व सवलतीच्या दरात संस्थेमार्फत विक्री केली जाते.
- ग्रामीण भागातील शाळा, वस्त्या येथे छोटी छोटी गंथालय सुरू करून ज्ञानसंपदा सर्वांपर्यंत पोहचविण्यात संस्थेला यश मिळाले आहे. घराघरातील वाचून झालेले साहित्य संकलित करून असे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.
- समाजातील सर्व साहित्यिकांसाठी चर्चासत्र संमलेन भरवून त्यांचे विचार व साहित्य समाजात रूजविण्यासाठी संस्थेचा सतत प्रयत्न असतो.
“जो शिकेल तो टिकेल” या भावनेतून वाङ्मय साहित्याच्या माध्यमातून संस्थेचे कार्य अविरत चालू आहे.