महिला विभाग

राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा अनेक ज्ञात अज्ञात मातांचे समाज निर्मितीच्याकार्यात व सामाजिक सुधारणांच्या बाबतीत खूपच महत्वाचे योगदान आहे. अशा सर्व थोर माता वंदनीय पूजनीय आहेत. त्यांच्या आशिर्वादाने व कार्याच्या प्रेरणेने संस्थेचा महिला विभाग कार्यरत आहे.

संस्थेच्या ध्येय उद्धिशनूसार “सेवा, वाडमय, समाज प्रबोधन” या त्रिसूत्रीच्या आधारे संस्थेच्या महिला विभागाचे काम पुणे जिल्ह्यात सुरू आहे. प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, संस्कार, संस्कृती, महिला सबलीकरण, उद्योजकता, जनजाती विकास या विषयांवर महिला विभाग सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहे.

संस्थेच्या महिला विभागाचे काही निवडक कार्यक्रम उपक्रम :

  1. सन्मान स्त्री शक्तीचा आपल्या समाजात अनेक महिला केवळ सामाजिक भूमिकेतून सेवाभावी वृत्तीने विविध सेवाकार्य करीत असतात. अशा महिलांचे सेवाकार्य समाजाला परिचित व्हावे व सर्वाचे सहकार्य अशा कार्यास प्राप्त व्हावे; म्हणून संस्था अशा निवडक महिलांचा सन्मान व पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न करीत असते. समाजातील अधिकारी महिला यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभते.
  2. महिला सबलीकरण :- विविध भागात महिला मेळावे विद्यालय व महाविद्यालयात लैंगिक अत्याचार व त्या विषयी असणारे कायदे याची सखोल माहिती तज्ञांमार्फत देऊन महिला सक्षमीकरण याबाबत संस्था कार्यरत आहे.
  3. संस्कार व संस्कृती संवर्धन :- यासाठी महिला विभागातर्फे खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हिंदू धर्मातील सण उत्सव परंपरा रितीरिवाज याविषयी चर्चा सत्र व विविध कार्यक्रमांची रचना केली जाते.
  4. संस्कार वर्ग :- शहरी व ग्रामीण भागात लहान मुलांसाठी संस्कार वर्ग भरविले जातात. दीपज्योती संस्कार वर्गामध्ये एकूण चाळीस विद्यार्थी सहभागी करून घेतले जातात. संस्कार वर्गामध्ये छोटया मुलांना विविध स्तोत्रे देशभक्तीपर गीते हे शिकवले जातात. छोट्या छोट्या खेळांमधून मूल्य संवर्धन केले जाते. अशा अनेक शाखा संस्थेमार्फत चालवल्या जातात.
  5. महिला प्रशिक्षण वर्ग संस्थेमार्फत घेतले जातात. जसे की वाहन प्रशिक्षण, नरसिंग प्रशिक्षण जेणे करून बिकट परिस्थितीत सुध्दा महिलांना आपल्या पायावर उभे राहता आले पाहिजे.
  6. महिला स्वरोजगार योजना : गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे रहाता यावे, स्वाभिमानाने, सन्मानाने जगता यावे या साठी संस्था स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शनात्मक कार्यक्रम राबवते.
  7. दिवाळी भेट :- वनवासी भागातील माता भगिर्नीसाठी दरवर्षी साडी वाटप कार्यक्रम घेण्यात येतो. अशा विविध सेवाभावी विषयांवर संस्थेचा महिला विभाग कार्यरत आहे.

आपले स्वत:चे कुटुंब, व्यवसाय याकडे विशेष लक्ष देऊन हा समाज आपला आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी आपलीच सांधिक ताकत व शक्ती आपणास तारून नेणार या विश्‍वासाने अनेक महिला संस्थेच्या या कार्यात सहभागी होत आहेत.