संस्थेची माहिती

स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था
नोंदणी क्रमांक: पुणे, एफ१७८४४. (महाराष्ट्र/२१९-२०००)

सेक्टर २७, प्लॉट ५१३, प्राधिकरण, निगडी, पुणे – ४११०४४
“सेवा, वाङ्मय, समाजप्रबोधन” या त्रिसूत्री वर आधारित संस्थेच्या उद्दीष्टांची व कार्यांची आपण माहिती घेऊयात.
दत्तोपंत म्हसकरांचा अल्पसा परिचय

स्व. दत्तोपंत म्हसकरांच्या कार्यातून त्यांच्या सामाजिक योगदानातून प्रेरणा घेऊन संस्थेची वाटचाल वृध्दींगत होत आहे, त्या दत्तोपंत म्हसकरांचा हा अल्पसा परिचय.
शांत मन, स्थिर बुध्दी, विशुध्द भावना, निष्कलंक चारित्र्य या आधारस्तभांवर उभे असलेले स्व. दत्तोपंतांचे जीवन मंदिर अनेक जणांचे प्रेरणा स्थान ठरले.
लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला आणि ते सहजपणे संघकार्याशी एकरूप झाले.
अंत:करणात रूजलेली संघनिष्ठा; परिस्थितीची बेचैन करणारी हाक यामुळे स्वाभाविकपणे स्व. दत्तोपंत संघप्रचारक म्हणून बाहेर पडले.
महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात संघप्रचारक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर १९७२ ते १९९४ या मोठया कालखंडात ते पुणे जिल्हाप्रचारक व पुणे विभाग प्रचारक म्हणून कार्यरत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशिष्ट कार्यशैलीतून समाजासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जी शृंखला आहे, त्या शुंखलेतील एक कडी म्हणजेच स्व. दत्तोपंत म्हसकर.
एक धीरोदत्त, सर्वांमध्ये सहजपणे समरस होणारे, जाईल तेथे उत्साह फुलवणारे उमदे व्यक्तिमत्व ७ जुलै १९९४ मध्यान्ही अनंताच्या प्रवासास निघून गेले. स्व. दत्तोपंतानी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संघविचाराने अनेक सामाजिक प्रकल्पांना गती दिली.
त्यांच्या प्रेरणेतून अनेक व्यक्ती, प्रकल्प, संस्था विविध सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत.
स्व. दत्तोपंताच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
संस्थेची पूर्णत्वास गेलेली सुसज्ज वास्तू

संस्थेची नोंदणी प्रमाणपत्रे
संस्थेचे कार्यकारी मंडळ

प्रदीप पवार – अध्यक्ष

विवेक पत्तरकीने – उपाध्यक्ष

मिलिंद कुलकर्णी – सचिव

अविनाश ब्रह्मे – कोषाध्यक्ष

संदीप पंडीत – सहकोषाध्यक्ष

भाग्यश्री अत्रे – सहसचिव

मुकुंद कुलकर्णी – कार्यवाह
कार्यकारणी सदस्य

अभिजित सोनटक्के

नरेंद्र खंबे

नरेश गुप्ता

श्रीराम नेरळेकर

तुकाराम पांचाळ
