वाङ्मय

समाज परिवर्तनासाठी वाडमय साहित्य हे फार मोलाचे कार्य करीत असतात. प्राचीन धर्मग्रंथ, राष्ट्रीय विचारधारांची पुस्तके, मान्यवर साहित्यिकांचे साहित्य, संतवाडमय यांनी समाजाला एक दिशा मिळते व सर्व समाज समान विचारधारेवर एकसंघ राहण्यास मदत होते. म्हणूनच संस्थेच्या कार्यात साहित्य याला विशेष महत्व आहे. असे सर्व साहित्य समाजात तळागाळापर्यंत पोहचविण्यांचे महत्वपूर्ण कार्य संस्था करीत आहे.

  1. आजपर्यंत संस्थेने बखर अयोध्येची’ हा रामजन्मभूमीचा अभ्यासपूर्ण ग्रंथ, तसेच ‘स्मृती पारिजात’ हा पूजनीय गोळवलकर गुरूजी यांच्या वरील गीतांचा संग्रह तसेच ‘गो-विज्ञान, गोमातेचे महत्व’, ‘स्वामी विवेकानंद व संघप्रार्थना’, ‘श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.
  2. पुणे जिल्हयातील प्रत्येक तालुक्‍यात अशा प्रकारचे प्रेरणादायी, चिंतनशील साहित्य पोहोचावे यासाठी वाडमय साहित्य विक्री केंद्र संस्था चालविते.
  3. छोट्या छोट्या गावात वस्तीत तसेच विविध कार्यक्रमात पुस्तकांचे प्रदर्शन व सवलतीच्या दरात संस्थेमार्फत विक्री केली जाते.
  4. ग्रामीण भागातील शाळा, वस्त्या येथे छोटी छोटी गंथालय सुरू करून ज्ञानसंपदा सर्वांपर्यंत पोहचविण्यात संस्थेला यश मिळाले आहे. घराघरातील वाचून झालेले साहित्य संकलित करून असे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.
  5. समाजातील सर्व साहित्यिकांसाठी चर्चासत्र संमलेन भरवून त्यांचे विचार व साहित्य समाजात रूजविण्यासाठी संस्थेचा सतत प्रयत्न असतो.

“जो शिकेल तो टिकेल” या भावनेतून वाङ्मय साहित्याच्या माध्यमातून संस्थेचे कार्य अविरत चालू आहे.