समाज प्रबोधन

संस्थेच्या कार्याचा तिसरा महत्वाचा उद्देश म्हणजे समाजप्रबोधन. “शहाणे करून सोडावे सकल जन” या संतवाणीप्रमाणे व्यक्ति संस्कारित करत समाज संघटन करण्यासाठी समाज प्रबोधन हा विषय संस्थेने आपल्या उद्दिष्टांमध्ये घेतले आहे.

केवळ एक व्यक्ति संस्कारीत , गुणवान अथवा समाजसेवा करणारी असून चालत नाही तर अनेक जण एकत्र येऊन प्रभावी शक्ती निर्माण करतील असा विश्वास समाज मनावर बिंबवण्यासाठी संस्थेद्वारे विविध कार्यक्रमांची रचना केली जाते.

१) अर्थकारण या विषयावर दरवर्षी संपन्न होणारा कार्यक्रम म्हणजेच अर्थसंकल्प, प्रसिध्द अर्थतज्ञांच्या याविषयी विश्लेषणात्मक हजारो नागरिक या भाषणाचा दरवर्षी लाभ घेत असतात.

२) बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वसामान्यांसाठी डिजिटल इंडिया, शेअर मार्केट, आर्थिक साक्षरता, कॅशलेस व्यवहार इत्यादी साठी प्रशिक्षण वर्ग व मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात.

३) शहरातील अनेक सेवा वस्तीत शिक्षण आरोग्य वैवक्तिक स्वच्छता बेटी बचाव पढाव मुलापेक्षा मुलगी बरी अशा सामाजिक विषयांवर विविध भूमिकेतून पथनाटयातून समाजप्रबोधनाचे संस्थेचे कार्य चालू आहे.

४) राष्ट्रीय पातळीवरील घडणाऱ्या, घटना, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, पर्यावरण संस्कार, संस्कृती याविषयी शहरी व ग्रामीण भागात प्रबोधनाचे विविध कार्यक्रम उपक्रम संस्थेमार्फत आयोजीत केले जातात.

“नोटबंदी – भारतीय अर्थव्यवस्थेला देणार मजबुती’ या विषयावरील मा. श्री. अनिलजी बोकील यांच्या भाषणाला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.