“सुसंस्कारित होऊया… देशाचे भविष्य घडवूया”
स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था संचलित “दिपज्योती संस्कार वर्ग” दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी इंदू निवास, सुदर्शन नगर येथील संस्थेच्या कार्यालयात सुरू करण्यात आला. या वर्गाच्या माध्यमातून दरवर्षी ५० विद्यार्थी सुसंस्कारित होत आहेत.
“सुसंस्कारित होऊया… देशाचे भविष्य घडवूया” हे ध्येय घेऊन एका विद्यार्थीनीपासून सुरू झालेल्या या संस्कार वर्गात बालकांमधे भारतीय संस्कृती आणि देशभक्ती रूजवण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात.
गुरूपौर्णिमा, आषाढी एकादशी, दहीहंडी, मातृदिन, नवरात्रोत्सव, दिपावली, मकर संक्रमण, होलिका उत्सव, हिंदू नववर्ष दिन या पारंपारिक उत्सवांचे वैज्ञानिक महत्व मुलांना सांगून हे उत्सव साजरे केले जातात.
कारगिल विजय दिन, स्वातंत्र्य दिन, वीर बाल दिन, शिवजयंती आणि याबरोबरच अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक आणि प्रेरणादायी व्यक्तिंचे जन्मदिन साजरे करून मुलांमध्ये देशभक्ती रूजवली जाते.
मुलांबरोबरच पालकांचे प्रबोधन होण्यासाठी विविध विषयांची व्याख्याने खास पालकांसाठी आयोजित केली जातात.
राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यालयाची साफसफाई करणा-या कर्मचा-यांचा मुलांच्या हस्ते सन्मान करून सामाजिक समरसतेचा वस्तूपाठ दिला जातो.
विद्यार्थ्यांची बौध्दिक आणि शारीरिक वाढ उत्तम होण्यासाठी दर महिन्यात “सुवर्ण प्राशन” उपक्रम घेण्यात येतो.