अरविंद – वृंदा सभागृह

स्व. दत्तोपंत म्हस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने अरविंद–वृंदा सभागृह समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम, संस्था/मंडळ बैठका, सांस्कृतिक उपक्रम इ. साठी भाड्याने उपलब्ध आहे. रहिवासी परिसरात असल्याने सभागृहाचा वापर शिस्तबद्ध, शांत व स्वच्छ पद्धतीने करण्याची विनंती.

सभागृहातील सुविधा

  • १०० खुर्च्या (सभागृहात)
  • व्यासपीठावर ५ खुर्च्या
  • टीपॉय
  • स्पीकर सेट
  • भोजन/अल्पोपहारासाठी आवश्यक असल्यास टेबल, खुर्च्या, झालर इ. योग्य भाड्याने उपलब्ध होऊ शकतात.
  • प्रोजेक्टर / AC / जेवण व्यवस्था (असल्यास) वेगळे शुल्क लागू शकते.

शुल्क व देयके

  • नोंदणी करताना ₹ 5000/- अनामत (डिपॉझिट) देणे आवश्यक.
  • सभागृह स्वच्छता शुल्क: ₹ 2000/-
  • नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्यास ₹ 1000/- प्रति तास अतिरिक्त आकारले जाईल.
  • अतिरिक्त खुर्च्या हव्याअसल्यास ₹ 20/- प्रति खुर्ची आकारले जाईल.
  • सभागृहाबाहेर/व्यतिरिक्त स्वतंत्र खोली आवश्यक असल्यास ₹ 1000/- वेगळे शुल्क.
  • कार्यक्रमापूर्वी संपूर्ण रक्कम भरून पावती घेणे आवश्यक आहे. पावतीशिवाय ताबा मिळणार नाही.

टीप: काही अपरिहार्य कारणाने कार्यक्रम रद्द झाल्यास अनामत रक्कम परत देण्याबाबतचा अंतिम निर्णय व्यवस्थापक मंडळाचा राहील.

महत्त्वाच्या नियम/अटी :

  • सभागृह “आपलेच आहे” अशा भावनेने वापरावे; कोणतेही नुकसान होऊ देऊ नये.
  • सभागृह रहिवासी परिसरात असल्याने फटाके व मोठा बँड/आवाज यास सक्त मनाई आहे.
  • पान/तंबाखू/गुटखा खाणे व थुंकणे सक्त मनाई — परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक.
  • वीज गेल्यास जनरेटर बॅकअपची सोय नाही; त्यामुळे त्याबाबत व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
  • संस्थेच्या मालमत्तेचे नुकसान/वस्तू हरवल्यास नुकसानभरपाई द्यावी लागेल.
  • पार्किंग स्वतःच्या जबाबदारीवर; रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • चहा/अल्पोपहार/भोजनाची व्यवस्था तळमजल्यावर आयोजकांनी करावी.

आरक्षणासाठी

आरक्षण/उपलब्धता/दरपत्रकासाठी कृपया फोन/व्हॉट्सऍप किंवा इन्क्वायरी फॉर्म द्वारे संपर्क करा.

📞 फोन नंबर

+९१ ८८८८८ ५९५९९ / +91 88888 59599
+९१ ९५५२५ ४६५०१ / +91 95525 46501
+९१ ९९२२० ५२६८६ / +91 99220 52686